अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर तालुक्यातील नेप्ती सिनामळा येथील रहिवासी इंदुबाई बंडू मोरे या महिलेस तीची ननंद व इतर व्यक्तीकडून वारंवार मारहाण होत असल्याने
संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी पिडीत महिलेने निवेदनाद्वारे नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावेळी पंकज मोरे, उर्मिला मोरे आदी उपस्थित होते. इंदुबाई मोरे यांनी तीची ननंद अनिता जपकर तसेच रावसाहेब जपकर, संगीता सुंबे, मीना मोटे, आशा मोटे, ऋषिकेश मोटे, आकाश मोटे,
दीपक सुंबे यांनी दि.9 ऑगस्ट रोजी जबर मारहाण केली होती. सदर घटनेची तक्रार तालुका पोलीस स्टेशनला दिली असता तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.
त्यानंतर मारहाण होऊन देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यात आला. पुन्हा 26 सप्टेंबर सदर आरोपींनी सकाळी मारहाण केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी पोलीसांनी एक महिना उलटून देखील कुठल्याही प्रकारे कारवाई केली नसून, सदर आरोपींकडून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे पिडीत महिलेचे म्हणने आहे. तरी तातडीने सदर आरोपींवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी इंदुबाई मोरे व तीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved