अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी पावसाने आपले रौद्र रूप धारण करत निसर्गाचा प्रकोप दाखवला आहे.
जिल्ह्यातील अस्तगाव परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ढग फुटीची प्रचिती आली. या पावसाने अस्तगावमध्ये थैमान घातले. गावाच्या दोन्ही बाजुंनी असलेल्या ओढ्यांना पुर आले. गावातील अदिवासी बांधवांच्या घरात पाणी शिरले, निम्म्या गावाचा संपर्क तुटला.
तसेच सोयाबिन, डाळींब, तसेच इतर सर्वच पिके गुंडघाभर पाण्यात होती. त्यामुळे हाता तोंडाशीला आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावुन नेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मंगळवार रात्रीच्या सुमारास तब्बल तास दिड सुरु असलेल्या पावसाने बघता बघता रुद्र रुप धारण केले.
या मुसळधार पावसामुळे नगर मनमाड हायवे लगत असलेल्या साखळी बंधारे तुडंब भरले. पाण्याच्या प्रवाहाने एका बंधार्याची मातीची भिंतच फुटली. त्यामुळे पावसाचे पाणी खाली गावाकडे वेगाने वाहाण्यास सुरुवात झाली. बघता बघता पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला.
काही वेळेत गावातील रहिवाश्यांच्या घरात अक्षरशा गुडघाभर पाणी साठले होते. त्याचा संसार पाण्यात बुडाला. प्राथमिक शाळेच्या प्रांगणातही पाणी साठले. शाळेच्या आवारात उभे असलेले ट्रॅक्टर निम्मे बुडाले. कालच्या पावसाचे नव्याने आलेले पाणी या बंधार्यांच्या सांडव्यातुन गावाच्या दिशेने वेगाने वाहत होते.
आजुबाजुचे पिके पाण्यात होती. खाली गावाच्या दोन्ही बाजुने ओढे प्रचंड वेगाने वाहत असल्याने गावातील सर्वच रस्ते पाणी खाली गेली होती. अस्तगाव खंडाळे रस्त्याचे वाहातुक विस्कळीत झाली. शेतात गुडघाभर पाणी अतिवृष्टीने शेतात तळे साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
पिके चांगल्या अवस्थेत होती. परंतु या अतिवृष्टीने पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचे दिसुन येत होते. त्यामुळे पिके वाया जाणार आहेत. शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने महसुल तसेच कृषी विभागाने पंचनामे करण्या शिवाय पर्याय नाही.
पंचनामे करा ! दरम्यान या अदिवासी बांधवांच्या घरात पाणी शिरुन त्यांचे संसार पाण्यात भिजले, त्यांचे नुकसान झाले, त्याचे पंचनामे करण्यात यावेत, शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली, त्याचे पंचनामे महसुल तसेच कृषी विभागाने करावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved