अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला आठवडे बाजार तब्बल सात महिन्यानंतर शनिवारी भरविण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये संपूर्ण आठवडे बाजार बंद करण्यात आले होते.
त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जेऊर येथे शनिवारी भरण्यात येणारा आठवडे बाजारही बंद करण्यात आला होता. जेऊरला दर शनिवारी मोठा आठवडी बाजार भरत असतो.

परिसरातील ससेवाडी, बहिरवाडी, डोंगरगण, इमामपूर, धनगरवाडी, खोसपुरी, पांगरमल येथिल शेतकरी येथे भाजीपाला विक्रीसाठी येत असतात.
शहरातील अनेक व्यापारी येथे आठवडे बाजार साठी आपल्या मालाची विक्री तसेच खरेदी करण्यासाठी येत असून लाखो रुपयांची उलाढाल या बाजारामध्ये होत असते.
सात महिन्यानंतर सुरु झालेल्या आठवडे बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आठवडे बाजार मोठा भरत असला तरी बाजारासाठी जागेची समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहे.
रस्त्यावरच बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. सीना नदी दुथडी भरून वाहत असल्याने सीना नदी पात्रात भरणाऱ्या बाजारला जागाच उपलब्ध राहिलेली नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved