ना बँड बाजा, ना वरात मात्र फिजीकल डिस्टन्सचे पालन मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : जगासह देशात कोरोना धुमाकूळ घालत असताना लग्नावर देखील त्याचे सावट दिसून येत आहे. निंबळक येथे नुकताच मायकल भारस्कर व प्रिती शिंदे याचा विवाह मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला.

ना बँड बाजा, ना वरात मात्र फिजीकल डिस्टन्सचे पालन करीत तोंडाला मास्क लाऊन वधू-वरांसह वर्‍हाड मंडळी उपस्थित होते. नेवासा येथील विलास भारस्कर यांचा मायकल मुलगा असून, निंबळक येथील भगवान शिंदे यांची प्रिती ही कन्या आहे.

यांच्या विवाहाची रेशमगाठ कोरोनाच्या लॉकडाऊन पुर्वीच बांधण्यात आली होती. मात्र लॉकडऊन मध्ये सर्व नियमांचे पालन करुन मायकल व प्रिती यांचा विवाह फादर अशोक पाडळे यांनी ख्रिश्‍चन पध्दतीने लावला.

वधू-वरांवर फुलांचा वर्षाव करुन शुभेच्छा दिल्या. अत्यंत साध्या पध्दतीने आनंदी वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला.

यावेळी सिताराम सकट, निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, भगवान शिंदे, नामदेव रोकडे, कैलास भारस्कर, विलास भारस्कर, राजू रोकडे, अमोल सकट, बाबा पगारे, रवी मंडलिक, कैलास शिंदे आदि उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment