येत्या दोन दिवसांत संपूर्ण नगर पुन्हा लॉकडाऊन ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असून शनिवारी शहरात 62 बाधित समोर आले आहेत.

तर जिल्ह्याची आकडेवारी 950 च्या पुढे गेली आहे. शहरामध्ये जास्त प्रमाणात रुग्ण संख्या वाढत चालली आहे. अनेक प्रभाग कोरोनाच्या सावटाखाली आले आहेत. आधीच अर्धे शहर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे.

मात्र, तरी करोना फैलाव थांबण्याचे नाव घेत नसल्याने संपूर्ण नगर शहरात कंटेंन्मेंट करण्याच्या विचारात महापालिका प्रशासन आहे.

यासाठी महापालिकेच्या पथकाने रविवारी शहरातील लक्ष्मीकारंजा परिसर व सावेडी उपनगरात पाहणी केली आहे. त्यानंतर सायंकाळी चितळे रस्ता, मिरावलीबाबा दर्गा चौक, लक्ष्मीबाई कारंजा, चित्रा टॉकीज, जिल्हा वाचनालय,

चितळे रस्ता, मिरावलीबाबा दर्गा चौक हा परिसर कंटेन्मेंट झोन आजपासून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान संसर्ग असाच वाढत राहिल्यास संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचा विचार महापालिका प्रशासनाचा असल्याचे सुत्रांनी सांगितले.

नगरमध्ये सध्या सिद्धार्थनगर, तोफखाना, आडतेबाजार, पद्मानगर, बागरोजा हडको व नंदनवन कॉलनी (बुरुडगाव रोड) आणि अन्य असे आठ कंटेन्मेंट झोन आहेत.

त्यातच आता रंगारगल्ली, पटवर्धन चौक, धनगरगल्ली, महाजन गल्ली, घुमरे गल्ली, गांधी मैदान, नवीपेठ, नेतासुभाष चौक, जगदीश भुवन मिठाईवाले हॉटेल पाठीमागील परिसर, कुंभारगल्ली, जुनी छाया टॉकीज परिसर,

नेहरू मार्केट ते पटवर्धन चौक हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या बफर झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद राहणार आहे.

शहरात करोनाचा संसर्ग न थांबल्यास कंटेन्मेंट झोन करण्यापेक्षा काही काळासाठी शहरच लॉकडाऊन करण्याच्या विचारात मनपा प्रशासन आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment