बसमध्ये चढताना महिलेचे दागिने चोरट्याने केले लंपास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नगर शहरात पुणे बसस्थानक औट गेटजवळ एसटी बसमध्ये चढत असताना गदींचा फायदा उठवत ‘होसाबाई गायकवाड या वृद्ध महिलेच्या खांद्याला लटकविलेल्या बॅगची चैन उघडून चोरट्याने सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्याचे दागिने चोरून नेले.

त्यात सोन्याची माळ, सोन्याची चैन असे दागिने होते. त्याचे वजन ५ तोळे आहे. भरदिवसा साडेअकरा वाजता ही दागिने चोरी झाले. हौसाबाई तुकाराम गायकवाड, रा. मच्छिमार कॉलनी,

मुंबई या ७० वर्ष वयाच्या वृद्ध महिलेने कोतवाली पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोनि राकेश मानगावकर यांनी भेट दिली. दागिने चोरणाऱ्या चोरट्याचा हेकॉ ढगे हे शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment