दहा ते बारा जणांच्या जमावाने तरुणाला बदडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- आर्थिक घेवाण देवाण यामाध्यमातून संबंधांमध्ये दुरावा येऊन याचे रूपांतर वादात झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, कर्जाचे हफ्ते न भरल्याने नोटरीद्वारे विकलेला डंपर परत आणण्यासाठी गेलेल्या मूळ मालकाच्या पुतण्यास दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण करीत डांबून ठेवल्याची घटना राहुरीमध्ये घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतची विजय बाळासाहेब वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, वाघ यांनी नारायण खंडागळे यांना डंपर विकला होता.

डंपरवर श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज आहे. त्यामुळे नोटरीत डंपरच्या कर्जाचे हफ्ते भरण्याची अट घातली होती. मात्र, खंडागळे यांनी हफ्ते भरले नाहीत.

फायनान्स कंपनीने तगादा लावल्याने वाघ यांनी पुतण्या संजय सुरेश वाघ याला 30 सप्टेंबर रोजी डंपर आणण्यास पाठविले. पांढरीचा पूल येथून डंपर आणताना संजय वाघ याला आरोपी नारायण हरी खंडागळे,

बद्रीनाथ खंडागळे (दोघेही रा.वांजोळी, ता.नेवासा), सरपंच थोरात, तसेच अनोळखी सात ते आठ जणांनी मारहाण केली. यावरुन पोलिसांनी वरील आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment