अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-घरात झोपलेल्या तरूणाला आरडा ओरड करून उठवीले आणि ब्लेडने वार करत लाकडी दांड्याने मारहाण करुन सर्व कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे. विजय सुनिल आडसूळ राहणार देवळाली प्रवरा. हा दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान त्याच्या घरात झोपला होता.
त्यावेळी आरोपी सुधीर ऊर्फ सुक्या राहणार देवळाली प्रवरा हा अनाधिकाराने त्याच्या घरात घूसला. आणि मोठ मोठ्याने आरडा ओरड करून तूझा भाऊ अजय कोठे आहे. असे म्हणाला.
त्यावेळी विजय आडसूळ हा म्हणाला की, काय झाले तू मोठ्याने घरात आरडा ओरडा करू नको. असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपीने त्याला शिवीगाळ करून ब्लेडने वार केले.
तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. तुझा भाऊ अजय यास समजावून सांग नाहीतर तुमच्या सर्व कुटुंबाला जिवंत सोडणार नाही असा दम दिला. असे फिर्यादीत म्हटले आहे.
विजय सुनिल आडसूळ याच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी सुधीर ऊर्फ सुक्या याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जानकीराम खेमनर हे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम