तोल गेल्याने तरूणाचा दुचाकीसह बंधार्‍यात पडून मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील पाणीसाठे, जलाशय तुडुंब भरले आहेत. परंतु अनेक ठिकाणी यामुळे दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे.

अशीच एक दुर्घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी-मोरवाडी परिसरात मोरवाडी ते इनामदार वस्तीकडे जाणार्‍या करपरा नदी पुलावर घडली आहे. दुर्गा मारुती लोखंडे (वय 35 वर्ष) हा तरूण पुलावरून पडल्यामुळे तो या पाण्यात वाहून गेला.

ही घटना मंगळवार दि.22 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली. दुर्गा हा भंगार आणण्यासाठी वांबोरीहून मोरवाडी इनामदार वस्तीकडे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गेला होता.

चिंचेचा मळा ते इनामदार वस्तीकडे जाण्यासाठी मध्ये करपरा नदी आहे. या नदीवरती पूल आहे. या पुलावरून तो पाऊस नसतानाही पलिकडे गेला.

परंतु त्या परिसरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुर्गा भंगार न घेताच परत इकडे येत असताना त्या नदीला पाणी पुलावरून होते.

परंतु या पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पूलपास करताना अचानक पाणी आल्याने व त्याचा रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे मोटारसायकल (क्रमांक एम एच 17 ए डी 28 55 हिरो होंडा) सह तो पुलावरून खाली पडला.

रात्रभर त्याचा शोध घेतला. परंतु त्याचा तपास लागला नाही. 11 वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृतदेह बंधार्‍याच्या डबक्यामध्ये आढळून आला. यावेळी मृतदेह बाहेर काढण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment