अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- श्रीरामपूर शहरातील काही महिला साईभक्त भाविकांच्या पर्स, वस्तु चोरी करण्यासाठी या परीसरात नेहमीच वावरतात. कधी बसस्थानक कधी साईबाबा मंदिर परिसर तर काही वेळा प्रसाद भोजनालय परीसरात फिरताना आढळून येतात.
अनेकवेळा गुन्हा करुन पसार देखील होतात. अशा 7 संशयित महिलांना साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षक यांनी शिताफीने पकडून पुढील कारवाई करण्यासाठी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे समजते.

एक महिन्या अगोदर अशाच संशयित महिलांनी मुंबई येथील साईभक्त महिलांची पर्स चोरी केली होती त्याचा अद्याप तपास लागलेला नाही.
त्यामुळे अशा घटना घडु नये यासाठी साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षकांना कडक कारवाईबाबत सुचना दिल्या आहेत. या पुढील काळात चोरीचे प्रकार रोखण्यासाठी साईबाबा संस्थान यांनी पुढाकार घेतला असून
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची तयारी शिर्डी पोलीस करीत होते. या बाबत. शिर्डी पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार माघाडे यांच्याशी संपर्क साधला असता सात महिला ताब्यात असल्याचे सांगितले.
या संबंधित महिलांवर कठोर कारवाई झाली तर शिर्डी परीसरात साईभक्त भाविकांनच्या चोरीला आळा बसेल असा ग्रामस्थांच्या भावना आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|