संगमनेरात पाकिस्तानचा झेंडा लावल्याची अफवा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील जोर्वे नाका येथे पाकिस्तानचा झेंडा लागला, असा खोटा संदेश समाज माध्यमांवर प्रसारीत करून दोन समाजामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करणारी अफवा पसरवल्याच्या कारणावरून एका जणाविरुद्ध येथे नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जोर्वे नाका परिसरातील एका हाय मॅक्स खांबावर मुस्लिम धर्मियांचा झेंडा लावण्यात आला होता. (दि.२०) ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास अभिषेक पंडुरंग जोर्वेकर (रा. जोर्वे, ता. संगमनेर) याने कोणतीही शहानिशा न करता जोर्वे नाका येथे पाकीस्तानचा झेंडा लागला, असा खोटा संदेश प्रसारीत करून समाज माध्यमावर अफवा पसरवली. यामुळे शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती.

दरम्यान, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह जोर्वे नाका येथे गेले. जोर्वे नाका येथे लावण्यात आलेला झेंडा हा पाकिस्तानचा नसून मुस्लिम धर्मियांचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी त्वरित नगरपालिकेला कळवून झेंडा काढण्यासाठी सांगितले. पालिका प्रशासनाने हा झेंडा काढून टाकला.

झेंड्या बाबत सोशल मीडियावर अफवा पसरवल्या प्रकरणी अभिषेक जोर्वेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची संगमनेर नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली. असून शहरातील वेगवेगळ्या २० ठिकाणी लावण्यात आलेले विविध धर्मीयांचे झेंडे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe