सूर्यनगर परिसरात संपूर्ण शांतता असून धार्मिक तेढ निर्माण करुन राजकारण करु नका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- नगर-औरंगाबाद रोडवरील तपोवन जवळ असलेल्या सूर्यनगर मधील घटनेचा अर्धवट माहिती देऊन सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करुन धार्मिक तेढ निर्माण केला जात असल्याची भावना येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वैयक्तिक भांडणाचे भांडवल करुन धर्माच्या नावावर राजकारण करण्याचे काम कोणी करु नका, असे पत्रक नागरिक या नात्याने सुनिल नारायण त्र्यंबके यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या या परिसरात शांतता असून, येथील नागरिक आरती करतात,

मंदिरात आरती करण्यास कुठलीही अडचण नसून, त्यामुळे बाहेरील व्यक्तींनी या ठिकाणी येऊ नये. घडलेली घटना दुर्दैवी आहे, मात्र या घटनेला धार्मिक रंग देऊन राजकीय स्वरुप देऊ नये, असे आवाहन श्री.त्र्यंबके यांनी केले आहे. सूर्यनगर परिसरात नागरिकांना कोणताही त्रास नसून संपूर्ण परिसर शांत आहे.

घटलेल्या घटनेचा गैरअर्थ काढून दोन समाजामध्ये दुही निर्माण करु नका. शहरातील वातावरण बिघडवू नका, बाहेरील लोकांनी सूर्यनगर परिसरात येऊ नये असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले असल्याचे सुनिल त्र्यंबके यांनी पत्रकात नमुद केले आहे.

सूर्यनगरमधील घटना घडताच तोफखाना पोलिस स्टेशनचे स.पो.नि. सुरोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, बाहेरील नागरिकांनी या भागात येऊ नये, कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, असे आवाहन श्री.सुरोशी यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment