अकोले : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील जनतेला सर्वसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. तालुक्यातील सर्व अतिशय चांगले काम आहे. त्यामुळे एकही रुग्ण तालुक्यात नाही.
आशासेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी मास्क व सॅनिटाझर आपण देणार आहोत, असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी सांगितले. अकोले तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार लोखंडे बोलत होते.
अकोले तालुक्यातील सर्वांना चांगले आरोग्य सुविधा व अन्नधान्य मिळाले पाहिजे. तसेच खरोखरच गरीब व्यक्ती वंचित राहिले नाही पाहिजे. विना रेशनकार्डधारकांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे.
किराणा दुकानदार यांनी चढ्याभावाने माल विकू नये; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, असेही आदेश खासदार लोखंडे यांनी दिले. खासदार लोखंडे यांनी विचारलेले प्रश्नाला उत्तरे देताना अधिकारी यांनी पुढील माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी उद्यापासून सुरू होत असून सुरवातीला ७५ थाळी उपलब्ध होणार असून गरीब व्यक्तींनी त्याचा फायदा घ्यावा. तसेच एप्रिल महिन्याचे रेशन वाटप झाले आहे.
नंतर मोफत रेशनवाटप होणार असून मे, जूनचे वाटप होईल. शिवाय सामाजिक संस्थामार्फत गरिबांना किराणा वाटप केले जातात. इतर भागातील कामगारांसाठी मवेशी व अगस्ती विद्यालयात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®