Ahmednagar News: विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्या दृष्टिकोनातून विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून जोरात तयारी सुरू आहे व एकंदरीत संपूर्ण राज्यांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.
इतकेच नाही तर विविध राजकीय पक्षांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप, तसेच विविध ठिकाणी सभांचा धडाका व इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी ही परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीचे एकंदरीत वातावरण आता तयार झाले आहे. राजकीय पक्षासोबतच आता या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी निवडणूक विभागाकडून देखील कंबर कसण्यात आलेले आहे.
याकरिता आवश्यक ती तयारी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जर आपण अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी आता जिल्हा निवडणूक विभागाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात एकूण 3763 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी जास्त लांब जावे लागू नये याकरिता विशेष काळजी जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात असणार 3763 मतदान केंद्र
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे व जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 3763 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता मतदान करण्यासाठी मतदारांना जास्त लांब जाण्याची गरज भासणार नाही व या दृष्टिकोनातून ही विशेष काळजी घेण्यात येणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या पाहिली तर ती 3731 इतकी होती.
परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली असून ती आता 3763 इतकी करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत बघितले तर विधानसभेला एकूण मतदान केंद्रांमध्ये 32 केंद्रांची वाढ करण्यात आलेली आहे.
विधानसभा निहाय मतदान केंद्रांची संख्या
अकोले विधानसभा मतदार संघ एकूण 307 मतदान केंद्र, संगमनेर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 288, शिर्डी विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्रे 270, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्रे 272, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 311,
नेवासा विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 276, शेवगाव विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 368, राहुरी विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 307, पारनेर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 366,
नगर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 295, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 345 आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान केंद्र 356 अशाप्रकारे मतदान केंद्रांची संख्या असणार आहे.