विकासकामांबाबत कुठेही कमी पडणार नाही : सुनिलभाऊ गडाख

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नेवासा तालुक्यात विकासकामांच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नसल्याचे माजी जि.प.सदस्य सुनिलभाऊ गडाख यांनी सांगितले. वांजोळीचा पाणी प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाल्याचं समाधान असून जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

वांजोळी-पांढरीपुल येथे श्री. गडाख यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे उद्घाटन झाले. पांढरीपुल चौफुला येथुन श्री. गडाख यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

लाभार्थीच्या घरासमोर नळ कनेक्शन पोहचवण्यात आलं आणि त्याच ठिकाणी जलपुजनाचा कार्यक्रम गडाख यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी उद्योजक मच्छिद्र पागिरे, जि प. सदस्य अनिलराव आडसुरे, चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, खोसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर, श्री. पोळ, वांजोळीचे सरपंच आप्पासाहेब खंडागळे,

उपसरपंच मंगेश पागिरे, राजश्री काळे, अमोल भवार, खोसपुरीचे सरपंच अविनाश आव्हाड, मुबारक पठाण, अल्ताफ बेग, पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाड, जालिंदर ढेरे, माऊली जरे, रावसाहेब काळे, हरी भवार, भगवान येळवंडे, नाना सुद्रुक, दत्तु जवरे आदि मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

वांजोळीचा पाणी प्रश्न सुनिलभाऊ गडाख यांनी मार्गी लावल्याने महिला भगिनींची पाण्यासाठीची वणवण थांबली असल्याचं सोमनाथ हारेर यांनी सांगितलं. तसेच खोसपुरी हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना देखील पाणी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी श्री. गडाख, बद्रीनाथ खंडागळे, सरपंच आप्पासाहेब खंडागळे यांचे खोसपुरी ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. अमोल भवार यांनी पांढरीपूल येथील जि.प.शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांची मागणी करत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याची विनंती गडाख यांच्याकडे केली.

वांजोळी येथील स्मशानभूमी परिसरात पंधरा हजार वनऔषधी वनस्पती लागवड केली असून ती गावच्या आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरणारी योजना असल्याचं विजया काळे यांनी सांगितलं.

विकास कामात अडथळा आणण्याचा डाव काही समाजकंटकांचा असतो, त्याकडे दुर्लक्ष करुन विकासकामे मार्गी लावावीत. चांगल्या कामाला आमचा नेहमी पाठिंबा असल्याचे आदिनाथ काळे म्हणाले.

यावेळी पाणी योजनेसाठी निःशुल्क जमीन देणारे अशोकराव खंडागळे, व्हा. चेअरमन सुभाष खंडागळे यांचं श्री. गडाख यांनी कौतुक केलं. चेअरमन बद्रीनाथ खंडागळे यांच्या विशेष नियोजनाने यशस्वीरीत्या कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार शंकरराव गडाख तसेच सुनिलभाऊ गडाख यांच्या विशेष सहकार्याने मार्गी लागला असून गावच्या विकासकामात मोलाची भर पडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe