अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ज्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले त्या सर्व पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आ. मोनिका राजळे यांनी महसूल, कृषी विभागाला दिल्या आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात शेवगाव आणि पाथर्डी तालूक्यात पावसाने दमदार सुरुवात केली. शेतीत बाजरी, मूग, जवस, तूर आदी पिकाची पेरणी केली.

file photo
अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली. बहुतांशी गावांत अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीने पीकांना फटका बसला. नुकसानीची भरपाई मिळणे आवशक असल्याने
दोन्ही तालुक्यातील महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना राजळे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा