‘ते’ दारुचे बॉक्स लुटणारे दोघे जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सोनई येथील सरकारमान्य देशी दारुचे दुकान फोडून दारुचे 23 बॉक्स चोरटयांनी लांबविल्याची घटना 12 ते ते 14 सप्टेंबर दरम्यान घडली होती. या प्रकरणी सोनई पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अजय राजेंद्र शिंदे (वय 21) रा.सोनई व हरि विलास साळूंके (वय 18) रा. सोनई असे या आरोपींचे नवे असून त्या दोघांना 19 सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बाबत माहिती अशी : सोनई येथील नवी पेठेतील व्यंकटेश रामस्वामी पालेपवार यांचे सरकारमान्य देशी दारुचे दुकान आहे लॉकडाऊन च्या काळात हे दुकान पुर्णपणे बंद असताना

दि.12 ते ते 14 सप्टेंबर दरम्यान हे दुकान फोडून चोरी केली होती. तशी फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दाखल होती. सोनई पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्याने तपास करुन सदर आरोपींना अटक केली.

या आरोपींनी आणखी एका घरफोडीची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जनार्धन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe