अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- गोदावरीत स्नान करण्यासाठी श्रावणी सोमवारी भल्या सकाळी गेलेले सचिन वानखेडे (वय २८) व भाऊराव वानखेडे (वय ३५) या चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाला.
येथील महादेव मंदिरातील महादेवाला श्रावणात अनेक भक्त पाणी घालतात. हे दोघेही पाणी घालायचे. तिसरा सोमवार असल्याने पहाटेच सचिन व भाऊराव गोदावरी नदीवर स्नासाठी गेले होते.

वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून जाऊ लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून जवळ असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
गेल्या आठ दिवसांत नाशिक परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा विसर्ग अधिक असल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आले.
तहसीलदार प्रशांत पाटील व पोलिस निरीक्षक मसूद खान यांनी नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. नावेच्या मदतीने भाऊरावचा मृतदेह सापडला.
सचिन आणि भाऊराव चुलतभाऊ असून दोघेही विवाहित होते. सचिनच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व आई-वडील, तर भाऊराव यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई-वडील असा परिवार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved