शिवसेनेत गेलेले ‘ते’ नगरसेवक म्हणतात औटींनी आम्हाला पाठबळ दिले नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावरून चांगलेच राजकीय रण तापले. आता यातील काही नगरसेवकांनी माजी आमदार विजय औटी यांवर निशाणा साधला आहे.

नगरसेवक किसन गंधाडे म्हणतात, आम्ही गेली अनेक वर्ष माजी आमदार विजय औटी यांच्या बरोबर कोणत्याही पदाची अगर आर्थिक अपेक्षा न ठेवता एकनिष्ठेने काम केले. त्यांनी आम्हाला पाठबळ दिले नाही.

आमची शिवसेनेत नेहमीच घुसमट होत होती. त्यामुळे शेवटी आम्हाला पक्ष सोडण्याचा निर्णय़ घ्यावा लागला. नगरसेवक नंदकुमार देशमुख म्हणतात की,

मी या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (कै) वसंतराव झावरे यांच्याच बरोबर काम करत होतो. मात्र, विजय औटी आमदार झाल्यानंतर ते शहराचा विकास करून शहराचा पाणीप्रश्न सोडवतील.

या अाशेने मी त्यांच्याबरोबर सेनेत गेलो. मात्र, गेल्या 15 वर्षात सत्ता असतानाही पाणी प्रश्न सुटला नाही. अाता आमदार नीलेश लंके

यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याबरोबरच शहराच्या विकासाचा शब्द दिला आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment