अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- नगर शहरात इंग्लंड येथून आलेल्या नागरिक व त्यांचे संपर्कात आलेले अहमदनगर येथील जनतेला शोधण्यासाठी अहमदनगर शहरात फिरत असलेली घंटा गाडीचा व भोंग्याचा वापर करून
पूर्ण अहमदनगर शहरात गाडी फिरवण्यात याव्यात, अशी मागणी एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात पहिल्या तुलनेत कोरोना रुग्ण कमी आढळत असले, तरी कोरोनाचे नवीन विषाणू काही देशात आले असल्याचे आणि त्या देशात परत लॉकडाऊन केले असल्याचे प्रसार माध्यमातून समजते.
इंग्लंडमध्येही कोरोनापेक्षा भयंकर विषाणू आल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी भारतात काही नागरिक विदेशातून भारतात आले असून त्यात इंग्लंड येथूनही नागरिक आले आहे. त्यातील ११ नागरिक इंग्लंड येथून आपल्या अहमदनगर शहरात आले आहे.
जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी नगर शहरात फिरत असलेल्या कचरागाडीचा म्हणजेच घंटागाडीचे स्पिकरचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात गाडी फिरवाव्या आणि जनतेला आवाहन करावे की, जे इंग्लंड येथून आलेले नागरिकांच्या संपर्कात आले त्यांनी स्वत:हून चाचणी करावी; अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved