अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
तसेच जिल्ह्यांतर्गत लुटीचे प्रकार देखील चांगलेच वाढीस लागलेले दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज कोठेतरी लुट झाल्याचे समोर येत आहे. यातच आमदार रोहित पवार यांचा मतदार संघ जामखेड तालुक्यात सध्या चोरटे सक्रिय झाले आहे.
शहरातील मोरे वस्ती येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी दोन वेगवेगळ्या ठीकाणी लोखंडी रॉडने मारहाण करून सोन्या चांदीचा ऐवज केला लंपास केला.
या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून चार चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी सपोनि निलेश कांबळे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात चोर्यांचे प्रमाण वाढतच चालले असुन
अनेक वेळा पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरी करत आहेत. मात्र पोलिसांन कडून गस्त वाढवली जात नाहीत. त्यामुळेच जामखेड शहरसह तालुक्यात चोर्यांचे प्रमाण वाढत असुन सध्या जामखेड शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved