या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात दोन चोरीच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 56 हजार 682 रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेला आहे. देवीदास भानुदास ठोंबरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

दुसरी घटना अशी कि, तालुक्यातील विसापूर फाटा येथे चंद्रकांत दत्तात्रय बेलसरे (वय 81, रा.महावीर कॉम्प्लेक्स, रंगोली हॉटेल मागे, केडगाव) या वृद्धाच्या हातातील कापडी पिशवी अज्ञात चोरट्याने हिसकावून नेली आहे.

यामध्ये 50 हजार रुपयांची रोकड, बँकेचे पासबुक व चेकबुक होते. हे गुन्हे अवघ्या एका दिवसात दाखल झाले आहेत. गेल्या आठ-दहा दिवसातील पोलिसांचे रेकॉर्ड पाहता दररोज अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment