सणासुदीच्या काळात या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संकट कमी होताना दिसत असतानाच आता दुसरे संकट घोंगावू लागले आहे. शहरासह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आता डोके दुखी ठरू लागली आहे.

सणासुदीचा काळ सुरु असून यातच वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव शहरात मोठी चोरीची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. शेवगाव शहरातील पैठण रस्त्यावरील सार्थक किराणा स्टोअर्सचे पत्रे उचकुन तब्बल एक लाख ८७ हजार रुपये किमतीचा किराणा मालावर चोरटयांनी डल्ला मारला.

गेल्या आठवडयातही याच दुकानास लक्ष बनवत पाच लाख रुपये किमतीचा किराणा माल तर शेजारील शुभम अँग्रो एजन्सी या कृषी सेवा दुकानातुन एक लाख ७१ हजार असा सुमारे सहा लाख ७१ हजार रुपयांचा माल चोरटयांनी लंपास केला होता. अदयाप पुर्वीच्याच दोन चो-यांचा तपास लागलेला नसतांना चोरटयांनी पुन्हा त्याच पध्दतीने पत्रे उचकुन त्याच दुकानांना लक्ष्य बनवल्याने शहरातील दुकानदार ऐन सणासुदीच्या दिवसात भयभीत झाले आहेत.

दरम्यान या चोरटयांनी दुकानातील आतील बाजूने पत्रे कापून शेजारील सार्थक किराणा स्टोअर्समध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील तुप, तेल, बदाम, काजू, विलायची व इतर किराणा सामान असा सुमारे दोन लाख ८७ हजार रुपये किमतीचा माल चोरटयांनी चोरुन नेला. त्यातील एकास कापलेल्या पत्र्यातून आत प्रवेश करतांना जखम झाल्याने दुकानात सर्वत्र रक्त सांडले होते.

याबाबतची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. नगर येथून ठसे तज्ञ व श्वान पथक दाखल झाले. श्वानाने थोडया अंतरावर माग काढला. रात्री उशीरा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर दत्तू शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment