नगर तालुक्यातील ‘या’ गावात चोरटयांनी उच्छाद मांडला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.

नुकतेच नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील वाघवाडीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रोख रक्कम व सोन्याच्या ऐवजाची चोरी केली आहे.

आण्णासाहेब शिंदे यांच्या घरातून पाच हजार रुपये रोख व एक तोळा सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याच परिसरातील अशोक विटकर यांचे 10 हजार रुपये चोरुन नेण्यात आले.

तसेच नंदु धनवटे, ज्ञानदेव धनवळे, ज्ञानदेव विटकर, नामदेव विटकर, नवनाथ येवले यांच्या घराचे कुलूप तोडून कपड्यांची चोरी झाली आहे.

नागरिक जागे झाल्याने चोरट्यांनी धुम ठोकली. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली.सकाळी घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe