अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- कोपरगाव शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून शहरात वाढलेल्या भुरट्या चोर्या, मटका, जुगार, अवैध व्यवसाय यामुळे पोलिसांचा वचक नसल्याचे चित्र दिसत आहे.
नुकतेच शहरात एक चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 2 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना कोपरगाव शहरातील रिद्धी-सिद्धी नगर येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहरातील गजबजलेल्या रिद्धी-सिद्धी नगर येथे राहत असलेले मधुकर चंद्रभान काळे यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे 2 लाख 63 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
यामध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल व तीन घड्याळे असा एकूण दोन लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत मधुकर चंद्रभान काळे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास स.पो.नी.दीपक बोरसे करत आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|