अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील टोलनाक्याजवळ दोन मालट्रक चालकांची लूट आणि एकाचा खून करणाऱ्या आठ आरोपींना लोणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केवळ 24 तासांच्या आतमध्ये गजाआड केले आहे.
कोल्हार येथे वेगवेगळ्या भागात दडून बसलेल्या आरोपींचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. हे दरोडेखोर अहमदनगर जिल्ह्यात रस्तालूट करत होते.
दोन दिवसांपूर्वी राहाता तालुक्यात एका ट्रकड्रायव्हरची सादर आरोपींनी गळा चिरून हत्या केली होती. हत्या आणी लूटमार करणारे आठ आरोपी पोलीसांनी जेरबंद केले असून हे सर्व आरोपी 25 ते 30 वयोगटातील आहेत.
या आरोपींकडे चौकशी केली असता अनेक दिवसापासून हे रस्तालूट करत असल्याच त्यांनी काबुल केले. दरम्यान लोणी परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत लोणी पोलिस ठाण्याचे सपोनि प्रकाश पाटील, पोसई नाना सुर्यवंशी, पोहेकाॅ अशोक शिंदे, राजेंद्र औटी, पोना दीपक रोकडे, संभाजी कुसळकर, पोकाॅ सोमनाथ वडणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार,
सपोनि शिशीरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ हिंगडे, मनोहर गोसावी, विजय वेठेकर, पोना सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, अण्णा पवार, विशाल दळवी, राम माळी, संतोष लोढे, दीपक शिंदे, पोकाॅ मच्छिंद्र बर्डे,
योगेश सातपुते, रविंद्र घुगासे, संदिप दरदंले, प्रकाश वाघ, रणजित जाधव, जालिंदर माने, चापोहेकाँ कोतकर, चापोना धुळे आदिंच्या पथकाने परिश्रम घेतले.
पोलीसांच्या ह्या धडाकेबाज कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे. आरोपी जेरबंद झाल्याने भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved