अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा : घरात रहा, सुरक्षित रहा रस्त्यावर फिरू नका, गर्दी करू नका, असे पोलिस व महसूल विभागाकडून वारंवार सांगूनसुद्धा काही लोक विनाकारण रस्त्याने फिरत असल्यामुळे आता या लोकांना अद्दल घडवण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी आता नवीन शक्कल शोधून काढली आहे.
जे लोक विनाकारण घराबाहेर रस्त्याने फिरताना दिसतील त्यांच्या हातात मी प्रशासनाने सांगूनसुद्धा घरात थांबलो नाही. मी बाहेर फिरत आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाचा, समाजाचा व देशाचा शत्रू आहे. असे लिहिलेले बोर्ड देऊन त्याचा फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध केला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय शहरी भागातील कोरोना आता ग्रामीण भागाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
तरीसुद्धा काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत गर्दी करत आहेत. या लोकांना आवर घालण्यासाठी श्रीगोंदा पोलीस, महसूल व आरोग्य विभाग रात्रीचा दिवस करून प्रयत्न करत आहेत. बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलीस व महसूल विभागाकडून चोपही देण्यात येतोय. अनेक लोक औषध न्यायला आलो, किराणा, भाजीपाला न्यायला आलो अशी ठरलेली कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत.
या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या लोकांना अद्दल घडवण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी ही नवीन युक्ती शोधून काढली असून, आता पोलीस, महसूल विभागाकडून अशा रस्त्याने फिरणाऱ्या लोकांच्या हातात आता हे मी समाज्याचा शत्रूचे बोर्ड दिसणार आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com