अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हटवल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास शेतकरी नेते अनिल देठे यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे कोसळले होते. त्यानंतर कांद्याचा जीवनावश्यक वस्तूूंमध्ये समावेश करण्यात आला.
कांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यात केंद्र सरकारला यश मिळत होते. शेतकऱ्यांना मात्र अनेकदा तोटा सहन करावा लागत असे. २०१४ मध्ये लाखो टन कांदा भावाअभावी शेतामध्येच सडला होता.
मागील वर्षी उत्पादन घटल्याने दर गगनाला भिडले. ते कमी करण्यात केंद्राला अपयश आले. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीवनावश्य वस्तूंमधील डाळी, खाद्य तेले व कांद्यावरील नियंत्रण हटवले.
त्यामुळे शेतकरी वर्गाला परराज्यात कांदा विक्रीची मुभा मिळेल. त्यासंदर्भात लवकरच कायदा संमत होणार आहे. निर्यातीवर बंधने न घातल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गास या निर्णयाचा फायदा होईल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com