जिल्ह्यातील या शेतकर्याने केलीय चक्क! निळ्या कलरच्या भाताची शेती… तुम्ही कधी पहिली का ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- आजवर तुम्ही तांदळाचे अनेकानेक प्रकार पहिले असतील. तसेच चिन्नोर, बासमती, कोलम, उकडा, मदर इंडिया या तांदळाच्या प्रकारांची नवे देखील ऐकली असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला निळा तांदुळाविषयी माहिती सांगणार आहोत.

हा भात नेमका कोठून कसा आला. तो आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर ऐका तांदळाचा हा प्रकार भारतातीलच आहे.

आसाम राज्यातून तो महाराष्ट्रात म्हणजे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आला आहे. पूर्वी आत्मामध्ये या कृषी विभागातील कार्यरत असलेले डॉ. रावसाहेब बेंद्रे हे आसाम राज्य कृषी विभागात सल्लागार आहेत.

त्यांनी ही नवीन जात महाराष्ट्रात आणली. विशेषतः अकोले तालुक्यातील आदिवासी भागात उपक्रमशील शेतकरी विकास आरोटे यांच्या शेतात तिचा प्रयोग केला. या तांदूळास आसामी ब्लॅक म्हणून ओळखले जाते.

सध्या त्याचे उत्पादन ९ एकरांत घेतले आहे. जाणून घ्या तांदळाचे फायदे जगभरात सर्वात महागडा औषधी तांदूळ म्हणून मूळ इन्डोनेशिआचा (आसामी ब्लॅक ) तांदूळ आता अकोलेत पिकला आहे.

शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. डायबिटीस, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर हा तांदूळ फायदेशीर ठरतो. त्यात फायबर,

लोह,ताम्र तसेच अॅन्टीऑक्सीटंटचे प्रमाण अधिक असल्याने कॅन्सररोधक व शरीर साफ करणारे म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. भारतात आसाम, मणिपूर, पंजाब, राज्यात याचे निर्यातक्षम पीक होते.

महाराष्ट्रात ते पहिल्यांदाच पिकवले असल्याचा अंदाज आहे. ब्ल्यू (ब्लॅक) राईसचे गुणधर्म औषधी आहेत. जगात तांदळाच्या तीस हजार तर भारतात सहा हजार जाती अढळतात.

महाराष्ट्रातील काळभाताची टरफल काळे तर तांदूळ पांढरे असतात. सध्या बाजारात या निळ्या भाताची ऑनलाईन खरेदीतीनशे ते पाचशे रूपये दराने विक्री होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment