‘या’ सरकारी इमारतीला मिळाले गडाखांचे नाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जेष्ठ साहित्यिक व नेते यशवंतराव गडाख यांनी नेवासे तालुक्यासह जिल्ह्यात प्रभावीपणे विकासात्मक कामे केली त्यांचे ते काम कायम आदर्शवत आहे.

त्यांच्या याच कामाची जाण ठेवत नेवासे पंचायत समितीच्या सुसज्ज इमारतीला ‘जेष्ठ साहित्यिक मा. खासदार यशवंतरावजी गडाख भवन’ असे नामकरण करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज संस्थेत कामाच्या माध्यमातून असलेले त्यांचे योगदान लक्षात घेऊन माजी सभापती व ज्येष्ठ नेते कारभारी जावळे यांनी संकल्पना मांडली होती

याप्रसंगी पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. गुरुवार (ता. २९) रोजी जावळे यांच्याच अध्यक्षतेखाली पंचायत समितीत झालेल्या

मासिक बैठकीत नामकरण करण्याची सूचना पंचायत समितीच्या सदस्या मीनाक्षी सोनवणे यांनी मांडली त्यास सविता झगरे यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी यास एकमुखी पाठिंबा दिला.

“मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे पंचायत समिती आदर्श काम करत असून जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी या आधी जिल्हा परिषद व पंचायत

समितीच्या माध्यमातून केलेले आदर्श काम भावी पिढीला कळावे म्हणून नामकरण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment