आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील ही ग्रामपंचायत होणार बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या जामखेड तालुक्यातील जवळपास ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत.

मौजे सोनेगाव येथेही निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. गेली तीस वर्षीपासून ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यावर्षी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा

संकल्प सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले आणि सोनेगाव येथील सर्व गावातील जेष्ठ नेते व युवकांनी सर्वानुमते ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात सोनेगाव येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गावात शांतता राहावी.

यासाठी आपन सर्वजन एकत्रितपणे येऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ, व प्रा.सचिनगायवळ यांच्यासह सुरेश भोसले यांनी सांगितले.

त्यास सर्व कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता सोनगाव ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मार्ग जवळपास मोकळ झाला आहे.