अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- गेल्या आठ महिन्यात मी 14 वेळा नगरला आलोय. मी आधीच सांगितलं होतं महिन्यातून एकदा मी नगरला येईल, नगरला मला सुंदर करायचे आहे. ते माझं स्वप्न आहे.
कोरोणाच्या परिस्थितीतुन बाहेर पडल्यावर हे स्वप्न मी पूर्ण करेल असा विश्वास नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
नगरच्या पालकमंत्र्यांना जनतेची काळजी नाही अशी टीका करणारे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
मुश्रीफ पुढे म्हणाले की, जिल्ह्यात होणार्या सगळ्या मीटिंगला सर्व मंत्र्यांना बोलावले जात नाही. ज्या मिटींगला त्यांना बोलावले जाते,
त्याला ते येतातच,’ असे सांगत मुश्रीफ म्हणाले, ’14 ऑगस्टला मी जी बैठक घेतली त्याला सर्व लोकप्रतिनिधींना बोलवले होते. त्या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आले, पण राधाकृष्ण विखे आले नाहीत.
कदाचित ते ज्येष्ठ नेते व मी ज्युनियर म्हणून ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,’ असे सांगतानाच पालकमंत्र्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात किती वेळा दौरा केला याची माहिती दिली.
अखेर 20 तारखेला मी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर आजपर्यंत तब्बल चौदा वेळा माझी नगरला भेट झाली आहे.
या जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी आपण चांगल्या निधीची तरतूद केली होती.
पण दुर्दैवाने कोरोना आला. नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.असेही त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved