अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात एकूण ६८ संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सदस्य व सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादाही ठरवण्यात आली. जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.
त्यासाठी आचारसंहिता लागू झाली असून ग्रामीण स्तरावर प्रचाराने आता वेग घेतला आहे. ७६७ ग्रामपंचायतीसाठी १५ हजार १६४ कर्मचारी व ५१९ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
एकूण २ हजार ८५९ केंद्रांवर मतदान होणार आहे. २ हजार ६२९ प्रभाग संख्या असून, सरपंच व सदस्य पदाच्या निवडणूक प्रचाराचा खर्च निश्चित करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ९४, पारनेर तालुक्यात ८८, नेवासे तालुक्यात ५९, नगर तालुक्यात ५९, श्रीगोंदा तालुक्यातील ५९ सह अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, शेवगाव, कर्जत, जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
सात ते नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्यासाठी २५०००, तर सरपंचपदासाठी ५० हजार, ११ ते १३ सदस्यांसाठी ३५ हजार, सरपंचपदासाठी १ लाख, १५ ते १७ सदस्यसंख्या असलेल्या सदस्यपदासाठी ५० हजार, तर सरपंचपदासाठी १ लाख ७५ हजार अशी खर्चाची मर्यादा निश्चित झाली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved