भाजपच्या अध्यक्षपदी ‘हा’ मराठा नेता बसणार ! नगरसेवकापासून ते मुख्यमंत्र्यांची शाळा घेण्याचे अधिकार

२०१४ नंतर देशातील सगळ्यात मोठ्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या प्रमुख पदाच्या नव्या जबाबदारीच्या अधिकारातून येणाऱ्या काळात भाजपची ताकद दाखवण्यासाठी देशातील भाजपच्या नगरसेवकापासून ते मुख्यमंत्र्यांची शाळा घेण्याचे अधिकार विनोद तावडे यांना मिळणार आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
maratha

२०१४ नंतर देशातील सगळ्यात मोठ्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या प्रमुख पदाच्या नव्या जबाबदारीच्या अधिकारातून येणाऱ्या काळात भाजपची ताकद दाखवण्यासाठी देशातील भाजपच्या नगरसेवकापासून ते मुख्यमंत्र्यांची शाळा घेण्याचे अधिकार विनोद तावडे यांना मिळणार आहेत.

तर, दुसरीकडे या जबाबदारीच्या माध्यमातून तावडे यांची आता पक्षाध्यक्षपदाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे संकेत राजकीय गोटातून मिळत आहेत. महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणातून विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर २०१९ ला देशाच्या राजकारणात पोहोचलेले विनोद तावडे यांनी गत

पाच वर्षांत भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली अनेक राजकीय ऑपरेशन अगदी लीलया पार पाडली आहेत. त्यामुळे तावडे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह यांची विशेष कृपादृष्टी असल्याचे बोलले जाते.

याशिवाय, विद्यार्थी परिषदेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांना मोठी ताकद दिली जात आहे. येणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपकडून देशपातळीवर सदस्य नोंदणी अभियानाची घोषणा करण्यात आली आहे.

२०१४ नंतर प्रथमच भाजप आपली ताकद किती आहे आणि त्यात किती विस्तार करायचा, या दृष्टीने पावले टाकत आहे. याच्या नियोजनासाठी नवी दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विनोद तावडे यांच्याकडे सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख पद देण्यात आले आहे.

भाजपच्या सर्वात महत्त्वाकांक्षी व २०१४ नंतरच्या सर्वात मोठ्या संघटनात्मक आयोजनाची ही जबाबदारी मानली तर जात आहेच, पण भाजपच्या दृष्टीने संघटनपर्व असणार आहे. नव्या जबाबदारीमुळे सर्व राज्यांत प्रदेश नेत्यांच्या बैठकीचे नियोजन करणे,

राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची बैठक घेणे, सर्व खासदार-आमदारांसोबत बैठक घेऊन नियोजन करणे, असे सर्व देशातील संघटनेचे अधिकार तावडे यांना मिळणार आहेत. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात तावडेंच्या राष्ट्रीय नेतृत्वाला मोदी-शाहांची परवानगी असल्याचे मानले जाते.

त्यामुळे येणाऱ्या काळात तावडे यांना या अभियानाच्या माध्यमातून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, यात ते यशस्वी झाल्यास राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतील तो मैलाचा दगड असेल, असा राजकीय निरीक्षकांचा दावा आहे.

मराठा चेहरा
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याच्या कारणांपैकी मराठा फॅक्टर हेदेखील एक कारण होत हे सर्वशृत आहे. महाराष्ट्रात भाजपाला मराठा नेतृत्वाची गरज आहे. तावडे हे मराठा समाजातून येत असल्याने त्यांचा चेहरा भाजपसाठी फायदेशीर ठरेल असे म्हटले जात आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe