पहिल्याच पावसात वाहून जाणार हा रस्ता…. मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष निकृष्ट दर्जाच्या कामाची संपूर्ण रक्कम जाणार ठेकेदाराच्या घशात !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगलाताई लोखंडे, सुरेखाताई कदम यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने पालिकेमध्ये पत्रव्यवहार करून 2016 व 17 मध्ये मंजूर करून घेतलेले काम मदवाशा दर्गा ते जुनी मनपा,

आशा टॉकीज ते कृष्णा मिसळ, गणेश मंदिर ते पाचपीर चावडी चौक व वाडिया पार्क ते जुनी महानगरपालिका, दोबोटी चिरा पर्यंत व मनपा गॅरेज ते शिवम टॉकीज व गणेश मंदिर ते भोपळे गल्ली पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण चे काम 70 लाखांचे मंजूर करून वर्कऑर्डर देखील काढण्यात आलेली आहे.

ठेकेदाराच्या दिरंगाईने आज ते काम चालू करण्यात आले आहे त्या कामाची पाहणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम कुठल्याही प्रकारचे खडी, मुरूम, कच न टाकता 4 ते 5 इंच लेअर करून डांबरीकरण रस्त्याचे काम चालू आहे.

वर्कऑर्डर होऊन देखील ठेकेदाराने काम चालू बळजबरीने केले आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे या रस्त्यावर फक्त डांबराची लेअर 4 ते 5 इंच असून येणार्‍या पहिल्या पावसातच हा रस्ता वाहून जाणार असल्याचे बोराटे म्हणाले

व मनपा प्रशासनाने येऊन या रस्त्याची पाहणी करण्यात यावी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी हे रस्ते शहरातील मध्यवर्ती भागातील असून हा रस्ता वारंवार बनवता येणार नाही त्यामुळे या रस्त्यांवर उत्कृष्ट दरजेचेच काम झाले

पाहिजे व या कामाची आयुक्त व त्यांच्या बांधकाम खात्यातील टेक्निकल टीम यांनी इस्टिमेट प्रमाणे काम चालू आहे की नाही याची पाहणी करून याचा अहवाल जनतेपुढे ठेवावा व कामाचा दर्जा न सुधारल्यास शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असल्याचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!