तब्बल १६ वर्षांनी भरला ‘हा’ पाझर तलाव! पावसाने बळीराजा सुखावला!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पाथर्डी तालुक्‍यातल्या मिरीनजिकचा शंकरवाडी शिवरातला पाझर तलाव तब्बल १६ वर्षांनी भरलाय. गुरुवारी दि. २३ रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला.

हा तलाव भरल्याने शंकरवाडी गावासह मिरी, फकिरवाडी, महालक्ष्मी हिवरा,चांदा या पाच गावांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, करंजी,

चिचोंडी, तिसगाव या भागांलादेखील रात्रीच्या पावसाने झोडपून काढल्याने या भागातील अनेक बंधारे नदी, नाले खळखळून वाहते झाले आहेत. सर्वदूर झालेल्या या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

शंकरवाडीचा तलाव तुडुंब भरल्यामुळे शंकरवाडी गावासह, मिरी, फकिरवाडी, महालक्ष्मी हिवरा, चांदा येथील शेतकऱ्यांना या तलावातील पाण्याचा मोठा फायदा होणार आहे.

यावर्षी कोरोनामुळे हतबल झालेल्या बळीराजाला वरुणराजाने मात्र मोठा दिलासा दिला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच वरुणराजाने ठिकठिकाणी समाधानकारक हजेरी लावली.

त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर शेतकर्‍याला मूग, मठ, तूर ही पिके साधता आली. त्याचबरोबर यावर्षी कपाशी आणि बाजरीचे पिकेदेखील जोमात आहेत.

मागील वर्षीच्या नागपंचमीला प्रत्येक वाडीवस्तीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी मात्र वरुणराजाने साथ दिल्यामुळे परिस्थिती बदलली आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe