जनता कर्फ्यू बाबत शिवसेनेची ही असणार भूमिका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अनेक काही नागरिकांसह नेतेमंडळींनी जनता कर्फ्यूची मागणी केली होती.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना जनता कर्फ्यूत सहभागी होणार नसल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता कर्फ्यू केल्यास सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार जनता कर्फ्यूची चर्चा आणि हालचाली सुरू आहेत.

आमदार संग्राम जगताप आणि महापौर बाबासाहेब वाकळे त्यावर अभ्यास करत आहेत. दरम्यान याबाबत बोलताना दिलीप सातपुते म्हणाले कि, जनता कर्फ्यू म्हणजे गोरगरिबांच्या रोजीरोटी बंद होणे.

आता कोणत्याही परिस्थिती जनता कर्फ्यू परवडणार नाही. जनता कर्फ्यू केल्याने कोरोना जाणार नाही. जरी केला तरी कोरोनापेक्षा भूकबळीने जास्त लोक मरतील.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्यास कोरोनाला अटकाव होईल. परिणामी जनता कर्फ्यूची गरज पडणार नाही.

गोरगरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या जनता कर्फ्यूत अहमदनगर शिवसेना सहभागी होणार नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment