अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तरुणास १२.६ लाखाची स्कॉलरशिप प्राप्त !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-  पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या संगणक विभागातील विद्यार्थी गोपाल पांडुरंग वाघ याची मिडास क्रिएटिंग इंटरप्रीमियर फ्लोरिडा,

पुणे येथे १२.६ लाखाची स्कॉलरशिप प्राप्त झाली असून, महाराष्ट्रातून यासाठी निवडला गेलेला तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

मिडास संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाइन अशा विविध प्रकारच्या चाचण्यांमध्ये गोपाल वाघ यास प्रथम क्रमांक मिळाला. संस्‍थेचे चेअरमन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले जाते.

सातत्‍याने नामाकिंत कंपन्‍या येवून विद्यार्थ्‍यांच्‍या मुलाखती घेतल्‍या जातात. या मुलाखातींसाठी विद्यार्थ्‍यांना संस्‍थेमधून मार्गदर्शन व प्रोत्‍साहन दिले जाते. गोपाल पांडुरंग वाघ याने मिळविलेल्‍या यशाबद्दल संस्‍थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.सुजयदादा विखे पाटील,

मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता पाटील, सहसचिव भारत घोगरे, ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी, कारखान्‍याचे संचालक कैलास तांबे, भाऊसाहेब खडे॔, भाऊसाहेब कडू, तांत्रिक संचालक डॉ. के.टी.व्ही रेड्डी, प्राचार्य डॉ.गुलाणी, विभागप्रमुख डॉ.सागर तांबे आदिंनी अभिनंदन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News