जिल्ह्यातील ‘त्या’ ८८ हजार कुटुंबास मिळणार मोफत साडी …कशी ती वाचा सविस्तर….

Published on -

Ahmednagar News : राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ राज्यात २४ लाख आणि जिल्ह्यातील ८८ हजार ३७ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना होणार आहे.

जिल्ह्यातील एक हजार ८८७ स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय योजनेतील साड्यांचे लवकरच वाटत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली.

राज्य शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये या संदर्भातील निर्णय घेतला.राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाच्या योजने अंतर्गत पुढील पाच वर्षे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अंत्योदय रेशन कार्ड धारक प्रत्येक परिवरास दरवर्षी रेशन दुकानावर एक साडी मोफत दिली जाणार आहे. राज्य यंत्रमाग महामंडळाचे वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे.

राज्यात अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या २४ लाखाहून अधिक आहे. तर नगर जिल्ह्यात ८८ हजार ३७ अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. यापूर्वी शिंदे-फडणवीस-पवार यांचे महायुती सरकारने आनंदाचा शिधा ही योजना राबवली होती. त्या पाठोपाठ मोफत साडी योजनेची सुरुवात केली आहे.

त्याची अंमलबजावणी देखील लवकरच केली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी ६३ हजार ४०२ साड्या उपलब्ध झाल्या आहेत. पुढील दोन दिवसात उर्वरीत साड्या प्राप्त होणार असून स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe