अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- ग्रामविकास विभागाच्या वतीने कोविड-19 संसर्ग आजारामुळे कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यासंदर्भात एक आठवड्याच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने अवर सचिव विजय चांदेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने विभागाच्यावतीने ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत 50 लाखाचे विमा कवच देण्यात आले आहेत .
संबंधित जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना कोविड 19 संसर्गामुळे 30 सप्टेंबर अखेर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यासंदर्भात प्रस्ताव एका आठवड्यात प्रशासनाला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत कर्मचारी ,अंगणवाडी,
मिनी अंगणवाडी कार्यकर्ता ,अंगणवाडी मदतनीस ,आशा कार्यकर्ता, जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी ,सी.एस.सी कंपनीचे केंद्र चालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी व कामगार यांचा समावेश करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved