श्रीगोंदा आणि संगमनेर मधून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुली दोन वर्षानंतर सापडल्या !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर सन २०२१ मध्ये संगमनेर व श्रीगोंदे तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. दोन वर्षांनंतर या मुलीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शोध घेतला आहे. त्यांची सुटका केली. पळवून नेणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

गणेश भाऊसाहेब चव्हाण (रा. पेमगिरी ता. संगमनेर) याने १९ एप्रिल २०२१ रोजी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेले होते. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तेव्हापासून तो पसार होता. तर अल्पवयीन मुलीचाही शोध लागत नव्हता. हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका आठरे यांनी गुन्ह्याचा तपास करून गणेश चव्हाण याला अटक केली, तर अपहृत मुलीची सुटका केली.

श्रीगोंदे तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला २०२९ मध्ये पळवून नेण्यात आले होते. दोन वर्षे तिला पळवून नेणारा तरूण पसार होता. या गुन्ह्यात उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी त्या तरूणाचा शोध घेऊन त्याला अटक केली.

अक्षय बापूराव गोरे (वय २५.रा ढोरजा वा. श्रीगोंदे), असे त्याचे नाव आहे. तपासकामी त्याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. तर, अपहृत मुलीची सुटका करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या उपनिरीक्षक आठरे, उपनिरीक्षक शिंदे, अंमलदार समीर सय्यद, अनिता पवार छाया रांधवन काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe