अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- निळवंडे कालव्यांचे प्रगतीपथावर असलेले काम न देखवल्याने विखे काही तरी वक्तव्य करतात. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्व देण्याची गरज नाही.
आमच्या शुध्द व प्रामाणिक हेतूला परमेश्वराची साथ मिळते आहे. दुसऱ्याचं वाईट चिंतणाऱ्यांनी आपलं राजकारण, कारखाना व्यवस्थित चाललाय का ते तपासण्याची गरज आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
दरम्यान निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. या कामासाठी आता निधी आल्यामुळे हे काम आता प्रगतीपथावर आहे.
या कामासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचे वक्तव्य करताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 55 व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, काही जण आमच्यावर सातत्याने राग काढतात. समन्यायी पाणी वाटपावर आम्ही बोलत होतो, मोर्चे आंदोलने करीत होतो.
त्यावेळी ते घरात लपून बसले. निवडणुकीपूर्वी दोन महिने अगोदर राज्याची जबाबदारी खांद्यावर पडली. जनतेचे प्रेम आणि आशीर्वादामुळे पहिल्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले.
सध्या फक्त तीनच फोटो चालतात हे पहावत नसेल तर काळा गॉगल वापरा असा सल्लाही थोरातांनी विरोधकांना दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम