अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोना रुग्णांची हजारी नेवासे तालुक्याने ओलांडली. साेमवारी नेवासे तालुक्यात ४४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. एकूण १०२७ पॉझिटिव्ह रुग्ण झाले.
नेवासे येथील कोविड केअर सेंटरला सोमवारी ११९ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये ३१ व्यक्ती तसेच खासगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल ८ व्यक्ती व जिल्हा रुग्णालयातून आलेल्या

अहवालात ५ असे तालुक्यातील ४४ व्यक्ती पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील ८० व्यक्तींच्या घशातील स्राव घेण्यात आले, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात ८ व्यक्ती बाधित आल्या.
यात घोडेगाव १, सोनई ३, शिंगणापूर १, लांडेवाडी १, भेंडा बुद्रूक १, नेवासे खुर्द १ यांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १०२७ झाली. तसेच ७०३ व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १८ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved