वीस दिवसात तिन बिबटे जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-तालुक्यातील शिरसाटवाडी येथे सुमारे दोन वर्षांय वयाच्या बिबट्याला जरेबंद करण्यात वन विभागाला यश आले. आता पर्यंत वीस दिवसात तब्बल तीन बिबट्यांना पकडण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी शिरसाटवाडी येथील वडदरा भागात डोंगराच्या पायथ्याला वन विभागाने पिंजरा लावला. त्यामध्ये भक्ष्य ठेवण्यात आले होते.

त्यांनतर शिकार करण्यासाठी या परिसरात हा बिबट्या आला असता पिंजऱ्यात अलगद अडकला. सकाळी अकरा वाजता वन विभागाला याची माहिती मिळाली.

त्यानंतर दुपारी ह्या बिबट्याला वन कर्मचारी घेवुन पाथर्डीच्या वनविभागाच्या कार्यालयात आले. येथून पुढील वैद्यकीय चाचणीसाठी बिबट्याला अहमदनगरच्या वन कार्यालयात दाखल घेवुन गेले.

तालुक्यात वनविभागने आतापर्यंत तिन बिबटे जेरबंद केले आहेत. तरीही नरभक्षक बिबट्या कोणता याचा तपास वनविभागालाही करता आलेला नाही. पूर्वी पकडलेले बिबटे नरभक्षक होते किंवा नाहीत याची कोणतीही माहीती स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment