अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- सध्या मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा फटका मानवास नेहमीच बसताना दिसतो. प्राण्यांची अधिवास नष्ट केल्याने जंगली प्राण्यांनी मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला.
याची अनेक उदाहरणे आज आपण पाहतो. अशीच घटना जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे घडली. बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन वासरे ठार झाल्याची घटना रात्री घडली.
परंतु हा बिबट्या आहे कि बिबट्या सदृश प्राणी याबाबत संभ्रम आहे. वनविभागाच्या अधिकार्याना माजी सरपंच पोपटराव गायकवाड यांनी घटनेची माहिती देताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी परिसराची पाहणी केली. काही ठश्यांचे नमुने ताब्यात घेतले. पावसामुळे ठश्यांची नीट ओळख पटली नाही. प्राथमिक अंदाजानुसार वासरावर हल्ला करणारे बिबटेच असू शकतात असे वनपाल अनिल खराडे म्हणाले.
जामखेड तालुक्यातील नायगाव, बांधखडक शिवारात गेल्या 20 ते 25 दिवसापूर्वी आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यास अजूनही वनविभागाला यश आले नसून आसपासच्या या भागात बिबट्याची दहशत कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी कोणी बाहेर पडण्यास घाबरत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved