कोपरगावात नवीन तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोपरगाव शहरात पुन्हा एकदा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मध्यवस्ती असलेल्या काले मळा परिसरातील ५२ वर्षीय पुरुष व त्यांचा ३० वर्षांचा मुलगा असे दोघे तसेच गांधीनगर मधील ५२ वर्षीय पुरुष असे एकूण तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

तालुक्यात एकूण १२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, ६ निगेटिव्ह झालेल्या रुग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले. बाधित रुग्ण राहत असलेला परिसर सील केलेला असून

त्यांचा संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]      

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe