थरारक ! पहाटे बिबट्याचा हल्ला ; चिमुरड्याला पळविले

Published on -

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डीमधील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा झालेला मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा याचीच पुनरावृत्ती झाली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याने हल्ला केला यात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

सक्षम गणेश आठरे (वय ८) असे या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूृ पावलेल्या मुलाचे नाव आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. अधिक माहिती अशी: सदर मुलगा शनिवारी रात्री घराच्या पडवीत झोपला होता.

रविवारी पहाटे त्यास बिबट्याने हल्ला करून पळवून नेले. नातेवाईक व वनविभागाच्या मदतीने पहाटेपासून शोध घेण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता सक्षमचा मृतदेह शेजारीच असलेल्या तुरीच्या पिकात आढळून आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News