अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-नगर शहर तसेच जिल्ह्यात सुरुवातीपासून सर्व यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. हजारो रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतत आहेत, ही चांगली बाब आहे.
उपचारांबरोबरच सर्वसामान्यांना विश्वास देण्याचे काम यंत्रणेकडून होत असल्याने नगर लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आडते बाजार मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी व्यक्त केला. मर्चंटस् असोसिएशनतर्फे जिल्हा रूग्णालयास एक्स रे मशिन,

इसीजी मशिन, मॉनिटर्स तसेच इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याची मदत नुकतीच देण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे ही मदत सुपुर्द करण्यात आली. यावेळी खा.सदाशिव लोखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखर्णा, शैलेश गांधी, गोपाल मनियार,
रवींद्र गुजराथी, सुशिल भळगट, ललित गुगळे, कांतीलाल गुगळे, मयुर पितळे, किशोर श्रीश्रीमाळ, अजित गुगळे, विजूशेठ गांधी, रितेश कोठारी, राजेंद्र बोथरा आदी उपस्थित होते. चोपडा म्हणाले, कोरोनाकाळात आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी,
जिल्हा प्रशासन, पोलिस बजावत असलेले कर्तव्य संपूर्ण मानवजातीसाठी उपकारक आहे. या सर्वांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved