अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर शहराच्या मध्यवस्तीत असलेली नेहरू भाजी मंडई तातडीने सुरू करावी या मागणीसाठी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी पालिकेसमोर भाजीपाल्याची गाडी लावून भाजी विकत आंदोलन करण्यात आले. दरम्यान हे आंदोलन पालिकेतील उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधी नगरसेवकांनी केले.

पालिकेच्या सत्ताधार्यांच्या आडमुठे धोरणामुळे नेहरू भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने भाजीमंडई सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सत्ताधार्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच भाजीपाला मार्केट तातडीने सुरू करा, अशी मागणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड,
अनिल कांबळे, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, रितेश रोटे, सुहास परदेशी यांसह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved