अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून जामखेड शहरासह तालुक्यातील व तालुक्याबाहेरील एकूण ४४७ जणांच्या तपासणी करण्यात आली.
यातील १६९ जण पाॅझिटिव्ह, तर ३०३ जण निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत मुत्यूची संख्या २८ झाली, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी दिली.
वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा शहर बंद करण्याचा विचार सुरू आहे. परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बबनराव बोलभट यांनी सांगितले, लोकवस्तीमध्ये नियमानुसार सेंटर उभे करता येत नाही,
तरी परवानगी दिली, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. तालुक्याबाहेरून रुग्ण मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी येथे येत आहेत. त्यामुळे तपासणी किटचा तुटवडा होत आहे.
त्यामुळे जामखेड तालुक्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांच्या तपासण्या करू नये, असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केले.
या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांच्याकडे त्यांनी तक्रार केली. यावर पोखर्णा यांनी आपण स्वतः जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढू, असे सांगितले.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी शहर बंद करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, तरच रुग्ण कमी होतील, अशी मागणी संजय कोठारी व प्रा. मधुकर राळेभात यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved